दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी हाफिज सईद दोषी

539

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी (टेरर फंडिग केस) लाहोरमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी गेल्या शनिवारीच सुनावणी होणार होती मात्र हाफिज सईदसोबतचा सह आरोपी सुनावणीला उपस्थित नसल्याने सुनावणी 11 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली होती.

पाकिस्तानातल्या पंजाब पोलिसांनी 17 जुलैला हाफिज सईद व त्याचा मलिक झफर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पंजाबमधील तब्बल 23 ठिकाणी हाफीज विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हाफिज सईदला अटक देखील झाली होती. सध्या हाफिज कोट लखपत तुरुंगात कैद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या