
हाफकीन बायोफार्मा कॉर्पेरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.
कोविड लसीच्या उत्पादनासाठी लस संशोधनाचा वारसा असणाऱया हाफकीन संस्थेने पुढे यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ, हाफकिन बायोफार्मा कॉर्पेरेशनचे संचालक संदिप राठोड, जनरल मॅनेजर सुभाष शंकरकार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.
हाफकीनमार्फत सुरू करण्यात येणाऱया लसीचे उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक कडील लस मोठय़ा स्करुपात घेण्यात येणार असून ती हाफकीन बायोफार्मा कॉर्पेरेशनमार्फत रिपॅकिंग क फिलिंग करून आकश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संयुक्तपणे केले जाते. कोकॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. यापैकी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत असून हाफकीन बायोफार्मा कॉर्पेरेशनला ही लस प्रमाणात लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकीनमार्फत ही लस उपलब्ध केली जाईल. तर स्कतंत्रपणे करोना लसीचे उत्पादन करण्यासाठी हाफकीन बायोफार्मा कॉर्पेरेशनला एक ते दीड कर्षाचा कालाकधी लागेल. हाफकीन बायोफार्मा कॉर्पेरेशनमार्फत कोकिड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरू ठेकण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशाकरील लस किकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंका केळीकेळी लागणाऱया अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल.
- भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र सरकारला सकिस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हाफकीन बायोफार्मा कॉर्पेरेशनामार्फत नक्याने उभारण्यात येणाऱया प्लांटसाठी आकश्यक निधीची मागणी करण्यात येणार आहे अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली.






























































