
आपल्या केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, आपण नानाविध प्रयोग सदैव करत असतो. केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, तसेच केस घनदाट ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु हे प्रत्येक उपाय आपल्या फायद्याचे ठरतात असे नाही. काही उपाय आपल्यासाठी हे केवळ बिनकामाचे उपाय ठरतात. म्हणूनच खूप जास्त पैसा न खर्च करता, आपण घरच्या घरी काही उपाय केले तर, आपल्या केसांची घनदाट वाढ होण्यास मदत होईल.
Hair Care – केसांना मुलतानी माती लावण्याचे काय होतात फायदे? वाचा
केसांच्या आरोग्यासाठी मोहरीचे तेल हे खूप महत्त्वाचे मानले जाते. मोहरीच्या तेलामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे आपल्या केसांची वाढ उत्तम होते.
मोहरीच्या तेलामध्ये थोडा ओवा, मेथी दाणे, काळी मिरी चांगली उकळवून घ्या. हे उकळलेले तेल गाळून थंड करा. हे तेल नंतर केसांच्या मुळाशी लावून किमान 10 ते 15 मिनिटे मसाज करावा.
केसांच्या चांगल्या वाढीसाठी, पुरेसे पोषण मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल वापरू शकता. आठवड्यातून एकदा मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास केस मुळांपासून मजबूत होतात.
केसांमध्ये पोषणाचा अभाव किंवा त्यांची योग्य काळजी न घेतल्यास कधीकधी केस पांढरे होऊ शकतात. पण जर तुम्ही आंघोळीच्या 2 तास आधी केसांना मोहरीच्या तेलाने व्यवस्थित मालिश केली तर केसांची काळजी खूप सुधारते आणि केस पांढरे होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावल्याने, केस घनदाट होतात. तसेच केसांची वाढही उत्तम होते. काही दिवसांमध्येच केसांची वाढ होताना आपल्याला निदर्शनास येईल.