यंदाही परदेशी नागरिकांसाठी हज यात्रा रद्द, सौदीच्या 60 हजार नागरिकांना प्रवेश

कोरोनाचा फटका हज यात्रेलाही बसला आहे. या वर्षीही परदेशी नागरिकांसाठी हज यात्रेला परवानगी नाकारण्यात आली आहे. सौदी अरेबियातील 60 हजार यात्रेकरूंना हज यात्रेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

सौदी अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार फक्त सौदी अरेबियाच्या 60 हजार भाविकांना हज यात्रेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या 60 हजार भाविकांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच या भाविकांना कुठलाही गंभीर आजार नसल्याची अट ठेवण्यात आली आहे.

गेल्या वर्षीही अशाच प्रकारे परदेशी मुस्लिमांसाठी हज यात्रा रद्द करण्यात आली होती. गेल्या वर्षी हिंदुस्थानातून हज यात्रेसाठी 2 लाख 30 हजार लोकांनी शुल्क भरले होते. हज यात्रा रद्द झाल्याने हे शुल्क यात्रेकरूंना परत मिळाले होते.

कोरोना संकटामुळे सौदी अरेबियाने परदेशी लोकांना हज यात्रेसाठी परवानगी नाकारली आहे.  हज यात्रेसाठी फक्त सौदी अरबच्या नागरिकांनाच परवानगी असणार आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय हज यात्रा या वर्षी रद्द करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या