
हिंदुस्थानी हवाई दलाला मार्च 2026 पर्यंत कमीत कमी हलक्या वजनाची सहा लढाऊ विमाने तेजस मिळणार आहेत. अत्याधुनिक लढाऊ विमान बनवणारी कंपनी हिंदुस्थान एअरोनोटिक्स लिमिटेड (एचएएल) चे प्रमुख डीके सुनील कुमार यांनी बुधवारी ही माहिती दिली. तेजस लढाऊ विमाने आतापर्यंत हवाई दलाला मिळायला हवी होती. विमाने देण्यास उशीर झाला आहे, अशी कबुली देत ते म्हणाले की, जीई एअरोस्पेसकडून इंजिन उशिरा मिळाल्याने हा उशीर झाला आहे. अमेरिकेची कंपनी जीई एअरोस्पेकडून एफ 404 इंजिन उशिरा पाठवल्याने तेजस लढाऊ विमाने बनवण्यास उशीर झाल्याचे एचएएल प्रमुखांनी सांगितले. जीई एअरोस्पेसकडून चालू आर्थिक वर्षात 12 इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमाने बनवण्यास सोपे जाईल. प्रत्येक कंपनीला टीकेचा सामना करावा लागतो. दुर्दैव म्हणजे एलसीए मार्क-1 च्या प्रकरणातसुद्धा असेच झाले. आम्ही विमाने बनवली. आजच्या घडीला आमच्याकडे सहा विमाने बनवून तयार आहेत, असेही ते म्हणाले.
‘प्रचंड’ हेलिकॉप्टर 2028 मध्ये
हिंदुस्थानी लष्कराला ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी 2028 मध्ये सुरू केली जाणार आहे. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) प्रचंड हिंदुस्थानचे पहिले स्वदेशी रूपाने डिझाईन आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. जे 4500 मीटरहून अधिक उंचीवरून संचालन करण्यात सक्षम आहे. मार्चमध्ये संरक्षण मंत्रालयाने लष्कराची पॉवर वाढवण्यासाठी 62,700 कोटी रुपयांच्या किमतीचे 156 हलक्या वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंडच्या खरेदीसाठी एचएएलसोबत करार केला होता.
2026 पर्यंत 12 जेट इंजिन
एचएएलला मार्च 2026 पर्यंत 12 जेट इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. एचएएलने पुढील वर्षापर्यंत 16 जेटचे उत्पादन बनवण्याची योजना बनवली आहे. संरक्षण मंत्रालयाने फेब्रुवारी 2021 मध्ये हवाई दलासाठी 83 तेजस एमके-1ए जेट खरेदीसाठी एचएएलसोबत 48 हजार कोटी रुपये रुपयांचा करार केला होता.