
पॅलेस्टाईनमधील गाझापट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी भल्या सकाळी इस्रायलवर तब्बल 5 हजारांवर रॉकेट्स डागली. यात किमान 100 जण ठार आणि शेकडो लोक गंभीर जखमी झाले. हमासच्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वमध्ये युद्धाचा भडका उडाला असून, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाची घोषणाच केली आहे. हमासला अद्दल घडवू. असा धडा शिकवू की ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल, असा इशारा नेतान्याहू यांनी दिला आहे. यानंतर इस्त्र्ाायली लष्कराने गाझापट्टीत बॉम्बहल्ले सुरू केले. त्यात 232 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. दरम्यान, एकीकडे रशिया-युव्रेन युद्धाचे परिणाम जग भोगत असतानाच आता इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा भडका उडाल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे
इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये अनेक दशकांपासून संघर्ष आहे. मात्र, शनिवारची सकाळ भीषण युद्धाची नांदी ठरली. गाझापट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी सकाळी साडेसहाच्या सुमारास रॉकेट डागण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक तब्बल 5 हजार रॉकेट डागण्यात आले. ऐतिहासिक जेरुसलेमसह इस्रायलची आर्थिक राजधानी असलेल्या तेल अविव आणि अनेक शहरांवर शक्तिशाली रॉकेटचा मारा केला. इस्रायलमध्ये ज्यू समाजाच्या धार्मिक सुट्टय़ा सुरू असताना अचानक हे हल्ले सुरू झाले. अनेक वर्षांनंतर इस्रायलवर हमासकडून भीषण हल्ला झाल्यामुळे प्रचंड अफरातफरी माजली. शेकडो घरांनी पेट घेतला. अनेक वाहने जळून खाक झाली. ‘इस्त्र्ाायली एन-12 न्यूज’च्या वृत्तानुसार हमासच्या हल्ल्यात किमान 100 जणांचा मृत्यू झाला असून, 561 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील 77 जणांची प्रकृती गंभीर आहे.
हमासच्या दहशतवाद्यांकडून अनेक इस्त्र्ाायली नागरिकांचे अपहरण, ओलीस ठेवले
गाझापट्टी येथून हवेतून, जमिनीवरून आणि समुद्रामार्गे 5 हजारांवर रॉकेट डागल्यानंतर हमासचे शेकडो दहशतवादी सीमा भागातील पुंपण तोडून इस्रायलमध्ये घुसले. इस्रायली लष्कराच्या काही रणगाडय़ांचा ताबा घेतला. तसेच काही इस्रायली सैनिक आणि दोन डझनवर नागरिकांचे अपहरण करून त्यांना गाझापट्टीत घेऊन ओलीस ठेवल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून दिसत आहे.
दिल्ली-तेल अविव विमान सेवा रद्द
युद्धाचा भडका उडाल्यानंतर हिंदुस्थानसह अनेक देशांनी इस्त्र्ाायलकडे जाणारी आपली विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे. दिल्ली-तेल अविव विमान उड्डाण रद्द केली आहे.
हिंदुस्थानींसाठी मार्गदर्शक सूचना
युद्धाचा भडका उडाल्यानंतर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इस्रायलमध्ये अनेक हिंदुस्थानी नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. हिंदुस्थानी नागरिकांनी सावध रहावे, घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी राहावे. तसेच आपत्कालीन मदत लागल्यास हिंदुस्थानच्या दूतावासाशी संपर्क साधावा, असे सरकारने म्हटले आहे.
हमासचे क्रौर्य; इस्त्रायली तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड
हमासच्या दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसिमा गाठली आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हमासचे दहशतवादी एका इस्त्र्ाायली तरुणीचा अर्धनग्न मृतदेह कारच्या मागील बाजूस ठेवून त्याची धिंड काढताना दिसत आहेत. काही दहशतवादी मृतदेहावर पाय ठेवून मारहाण करत आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते.
इराणकडून हमासला फंडिंग
इस्त्र्ाायलवर आज झालेला भयंकर हल्ला हा मोठा कटाचा भाग असून, त्यासाठी इराणकडून हमासच्या दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचे वृत्त फॉक्स न्युजने दिले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी 3 ऑक्टोबर रोजी ट्विटरवर निर्णायक लढय़ासाठी पॅलेस्टाईनने तरुणांनी सज्ज रहावे, असे अवाहन करताना इस्त्र्ाायलला इशारा दिला होता. दरम्यान इराणचे मेजर जनरल याहया रहिम साफावी यांनी हमासच्या हल्ल्याचे समर्थन केले असून, इस्त्र्ाायविरुद्ध युद्ध सुरु असल्याचे म्हटले आहे.
हिंदुस्थानी विद्यार्थी सुरक्षित
इस्रायलमध्ये शिक्षण घेत असलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी या घटनेची आपबीती सांगितली. आम्हाला सकाळी साडे पाच वाजता अलर्ट मिळाला. आम्ही जवळपास 7 ते 8 तास बंकरमध्ये होतो. आम्हाला घरातच थांबण्यास सांगितले आहे. आम्ही हिंदुस्थानी दुतावासाच्या संपका&त आहोत, असे आदित्य करुणानिधी निवेदिता या विद्यार्थ्याने म्हटले. सकाळची ही घटना पाहून मला खूप भीती वाटली. परंतु, इस्रायली पोलीस सोबत असल्याने आम्ही सुरक्षित आहोत, असे गोकू मनावलन या विद्यार्थ्याने सांगितले. हे खूप वेगाने झाले असून खूप भयानक आहे. हिंदुस्थानी दुतावास आमच्या संपका&त आहे, असे विमल कृष्णसामी मणिवन्नन चित्रा या विद्यार्थ्याने सांगितले.
इस्रायली लष्कराने भोंगे वाजवले; आपत्कालीन बैठक
– गाझापट्टीतून हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायल लष्कर तातडीने अॅक्शन मोडवर आले. इस्रायली लष्कराने भोंगे वाजवून नागरिकांना अलर्टचा इशारा दिला. भोंग्याचे आवाज तेल अविवपर्यंत ऐकू आले.
– पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तातडीची आपत्कालीन बैठक बोलविली आणि हा हल्ला पिंवा चकमक नाही, तर युद्धच आहे, असे जाहीर करीत युद्धाची घोषणा केली.
– सीमा भागातून घुसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करू. तसेच हमासला अशी अद्दल घडवू की, त्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल, असा इशारा पंतप्रधान नेतान्याहू यांनी दिला.
– इस्रायली लष्कराने गाझापट्टीत हमासच्या अड्डय़ांवर बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. आतापर्यंत किमान 200 वर पॅलेस्टाईन नागरिकांना ठार करण्यात आले असून, शेकडोजण जखमी आहेत.
हिंदुस्थान, अमेरिकेकडून हमासच्या हल्ल्याचा निषेध
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्र्ाायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्याचा अमेरिका, हिंदुस्थानने निषेध केला आहे. तर इराण, लेबनॉन, कुवेत या अरब देशांनी हमासला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, सौदी अरेबिया आणि रशियाने सावध भूमिका घेतली असून, तणाव निवळण्यासाठी आम्ही इस्त्र्ाायल आणि पॅलेस्टाईन या दोघांशी बोलत आहोत, असे म्हटले आहे.
मशीद अपवित्र केल्याने घेतला बदला
हा हल्ला म्हणजे जेरुसलेममध्ये अल-अक्सा मशीदला इस्रायलकडून अपवित्र केल्याने घेतलेला बदला आहे. इस्रायल पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशीदमध्ये ग्रेनेड फेकले होते. त्याचा आज बदला घेतल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने या ऑपरेशनला ‘अल-अक्सा फ्लड’ नाव दिले आहे. तसेच ही कारवाई म्हणजे अरब देशाला आमचे उत्तर आहे. जे इस्रायलशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे हमासचा प्रवक्ता गाझी हामदने म्हटले आहे.




























































