हातांवर उभा राहून ‘स्टंट’ करणाऱ्या तरुणाचा 100 फूट खोल दरीत पडून मृत्यू

1027

सार्वजनिक स्थळांवर मित्रांसोबत मौज-मस्ती करताना अनेकदा तरुण-तरुणी भान राखत नाहीत. अनेकदा काहीतरी वेगळे ‘स्टंट’ करण्यासाठी तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. असाच एक स्टंट करताना 20 वर्षीय तरुणाने आपला मौल्यवान जीव गमावला आहे. डोंगर कडांवर हातांवर उभा राहून स्टंट करणाऱ्या तरुणाचा 100 फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू झाला आहे. ब्रँडली स्टीटर (bradley Streeter) असे या ऑस्ट्रेलियन तरुणाचे नाव आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रॅडली स्टीटर हा काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसह ‘लाईमस्टोन कॉस्ट’ नावाच्या एका डोंगरावर फिरायला गेला होता. ‘लाईमस्टोन कॉस्ट’च्या रेलिंगवर दोन्ही हातांवर उल्टा उभा राहून ब्रॅडली स्टीटर मित्रांना स्टंट दाखवत होता. याचवेळी त्याचा तोल गेला आणि तो 100 फुट खोल दरीमध्ये कोसळला. घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी कँप्बेल हिल यांनी ‘एबीसी न्यूजशी’ बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला असून रविवारी रात्री 3 वाजता त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला असेही सांगितले.

mount-gambier

‘लाईमस्टोन कॉस्ट’ हा भाग दक्षिण ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या ठिकाणी घडलेली अशी ही पहिलीच घटना नाही. याआधीही 2005 मध्ये 21 र्षीय तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी त्यांनी स्वत:हून उडी घेऊन आत्महत्या केली होती.

तसेच 2011 मध्ये दोन व्यक्ती खालून वर चढाई करत होते. यावेळी एका व्यक्तीने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि उडी मारली. मात्र अंदाज चुकल्याने तो खाली कोसळला. यात त्या व्यक्तीला दुखापत झाली होती. तर दुसऱ्या व्यक्तीला शिडीच्या मदतीने खाली उतरवण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या