2020मध्ये ‘गुगल हँगआऊट’ बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘इनबॉक्स’नंतर गुगलचे ‘हँगआऊट’ हे मेसेजिंग ऍपही वर्ष 2020 मध्ये बंद होणार आहे. बऱ्याच युजर्सनी हँगआऊट हे ऍप आता जुने झाले असून त्याच्या परफॉर्मन्समध्येही तांत्रिक अडचणी येत असल्याचे मत नोंदविल्यानंतर गुगलने ‘हँगआऊट’ची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्ष 2013 मध्ये गुगलने ‘जीचॅट’च्या जागी हँगआऊट हे ऍप्लीकेशन लॉन्च केले होते. यात मेसेजिंग, व्हिडीओ चॅट, एसएमएस आणि व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल यांसारखे फिचर्स होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून गुगल या ऍपवर नवीन अपडेट देत नाही. एसएमएस मेसेजिंगची सुविधाही बंद करण्यात आली आहे. फक्त जीमेलवर हँगआऊट हा चॅट ऑप्शन उपलब्ध असून जीमेल युजर्स त्याचा बऱयापैकी वापरदेखील करीत आहेत.

एक ब्रँड म्हणू हँगआऊट चॅट आणि हँगआऊट मीट हे ऑप्शन सुरू राहणार आहेत. हँगआऊट चॅट टीम कम्युनिकेशनसाठी तर हँगआऊट मीट एक मीटिंग प्लॅटफॉर्म म्हणून वापरण्यात येणारा पर्याय आहे.