#HappyBirthday मुलतानचा ‘सुलतान’! वाचा सेहवागचे काही खास विक्रम…

टीम इंडियाचा माजी सलामीवर खेळाडू विरेंद्र सेहवाग याचा आज 42 वा वाढदिवस आहे. आक्रमकतेचे दुसरे नाव असलेला, गोलंदाजांवर दहशत निर्माण करणाऱ्या सेहवागने 2015 मध्ये आपल्या 37 व्या वाढदिवशी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. टीम इंडियाकडून खेळताना सलामीला येऊन गोलंदाजांची हवा टाईट करणाऱ्या मुलतानच्या ‘सुलतान’ला जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही सेहवागच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. वयाच्या या टप्प्यावरही सेहवाग सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याच्या चाहत्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

जाणून घेऊ त्याच्या काही खास विक्रमांची माहिती…

– कसोटी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरीने मोठी खेळी साकारण्याचा अनोखा विक्रम विरुच्या नावावर आहे. 2008 मध्ये चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विरुने 104.93 च्या सरासरीने 319 धावा चोपल्या होत्या.

virender-sehwag1

– ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल तीन वेळा 290 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम विरुच्या खात्यावर जमा आहे. ब्रॅडमन यांनी 334, 334 आणि नाबाद 299 धावा चोपल्या होत्या, तर विरुने 319, 309 आमि 293 धावा करत त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

virender-sehwag2

– सर्वात कमी चेंडूत त्रिशतक ठोकण्याचा विक्रमही विरुच्या नावावर आहे. याशिवाय कसोटीत त्रितशक आणि वन डेमध्ये द्विशतक करणारा विरु जगातील पहिला फलंदाज आहे. विरुसह वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल यानेही अशी कामगिरी केली आहे.

virender-sehwag5

– कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद 10 द्विशतकांमध्ये विरुच्या पाच खेळींचा समावेश होतो. विरुने कसोटीत सलग 11 अशी शतकं झळकावली आहेत ज्यात त्याने 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

virender-sehwag4

– कसोटी क्रिकेटमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या खेळाडूत विरुचा पहिला नंबर लागतो. विरुने आफ्रिकेविरुद्ध एकाच दिवशी 284 धावा चोपल्या होत्या.

virender-sehwag3
– 14 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सेहवागने 104 कसोटी सामन्यांमध्ये 49.42 च्या सरासरीने 8586 धावा केल्या, यामध्ये 23 शतकांसह 32 अर्धशतकांचा सहभाग होता. 251 एकदिवसीय सामन्यांमध्ये सेहवागने 8273 धावा केल्या. ज्यामध्ये 15 शतकांसह 38 अर्धशतकांचा सहभाग होता.

virendra-sehwad-and-gangull

– सेहवागने 19 अंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 394 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये 104 लढतीत 2728 धावा त्याच्या नावावर आहेत. यात 2 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या