आगरकरांना पैकीच्या पैकी गुण; निवड समितीच्या धाडसी निर्णयाचे हरभजनकडून कौतुक

माजी फिरकीपटू हरभजन सिंगने टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या हिंदुस्थानच्या संघाबाबत बीसीसीआयच्या  निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचे तोंडभरून काwतुक केले आहे. निवड समितीने धाडसी आणि संतुलित निर्णय घेत बलाढय़ आणि दमदार संघ निवडल्याबद्दल आगरकरांना पैकीच्या पैकी म्हणजेच दहापैकी दहा गुण द्यायला हवेत, असे काwतुकास्पद मत हरभजनने व्यक्त केले.

हा संघ खरोखरच अत्यंत मजबूत आहे. याआधीही आपण सांगितले होते की, या निवडीसाठी अजित अगरकर पूर्ण गुणांचे मानकरी ठरतात. संघात निवडलेला प्रत्येक खेळाडू स्वतःच्या जोरावर सामना जिंपून देण्याची क्षमता ठेवतो, हीच या संघाची सर्वात मोठी ताकद असल्याचे हरभजन अभिमानाने म्हणाला.

शुभमन गिलला संघाबाहेर ठेवण्यात आल्याने थोडी हुरहूर लागल्याचे हरभजनने मान्य केले, मात्र त्यांनी भविष्यासाठी सकारात्मक सूर लावला. गिलसाठी थोडे वाईट वाटते, पण त्याला पुढे निश्चितच अधिक संधी मिळेल.  संघनिवडीत काही निर्णय कठीण असतात; मात्र संघाची ताकद हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही हरभजनने स्पष्ट केले. हिंदुस्थानच्या संघ असा आहे की प्रत्येक खेळाडू सामना जिंपून देऊ शकतो. त्यामुळे हिंदुस्थान सलग दुसऱयांदा टी-20 वर्ल्ड कप जिंपू शकतो, असा ठाम विश्वास हरभजनने बोलून व्यक्त केला. कर्णधार सूर्यपुमार यादव यांच्या अलीकडील फॉर्मवर होत असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना हरभजनने त्याची बाजू घेतली. सूर्यपुमारने सध्या फार धावा केल्या नसल्या तरी मोठय़ा स्पर्धांमध्ये मोठे खेळाडूच चमकतात. वर्ल्ड कपमध्ये सूर्यपुमार निर्णायक भूमिका बजावेल, याबाबत त्याने विश्वास व्यक्त केला.

काही खेळाडूंवर खास विश्वास व्यक्त करताना हरभजन म्हणाला की, अभिषेक शर्मा एकहाती सामना जिंपून देऊ शकतो. हार्दिक पंडय़ा सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, तो संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमरा यांच्यासारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांमुळे हिंदुस्थानची मदार अधिक भक्कम असल्याचे हरभजनने सांगितले.

हिंदुस्थानच्या संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत आणि अलीकडील कसोटी निकालांवरही हरभजन यांनी आपले मत मांडले. हिंदुस्थानसारख्या संघाचा प्रशिक्षक होणे ही मोठी जबाबदारी असते. संघ चांगला खेळत असताना सगळे शांत असते, मात्र कामगिरी खालावली की सर्वप्रथम बोट प्रशिक्षकाकडेच वळते, असेही परखड मत त्याने व्यक्त केले.