
सीएसएमटी ते पनवेल फास्ट एलिवेटेड कॉरिडॉरला पुन्हा चालना मिळाली असून हा प्रकल्प खासगी आणि सार्वजनिक सहभागातून पीपीपी मॉडेलद्वारे उभारण्यात येणार असून याबाबत एका कंपनीशी चर्चा सुरू असून लोकलही ही संबंधित कंपनीच चालविणार आहे. हा सीएसएमटी ते पनवेल फास्ट एलिवेटेड मार्ग पूर्ण झाल्यास 75 मिनिटांचा प्रवास 45 मिनिटांत करणे शक्य होणार आहे.
सीएसएमटी ते पनवेल हा प्रकल्प मध्यंतरी बारगळा होता. त्यानंतर हा निर्णय मागे पडत सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्गाला पुन्हा चालना मिळणार आहे. एका खाजगी कंपनीने सीएसएमटी ते पनवेल उन्नत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रुची दाखवली असून त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे एका रेल्वे अधिकार्याने सांगितले.
11 स्थानकांचा 55 कि.मी.चा मार्ग
या एलिवेटेड फास्ट कॉरिडॉरने मुंबई ते पनवेल हे 75 मिनिटांचे अंतर 45 मिनिटांत गाठता येणार आहे. तब्बल 55 कि.मी.च्या या उन्नत मार्गावर 11 स्थानके असणार असून नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मार्ग अखेर मेट्रोने जुन्या विमानतळाशीही जोडले जाणार होता.
























































