मी ठरवलं अन् करून दाखवलं…, विश्वविजयानंतर हार्दिक पंड्या भावूक; 2017 पासूनच्या संघर्षावर सोडले मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर इतिहास रचला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा ICC टी-20 2026 च्या वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. टीममधील प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. या विश्वविक्रमी विजयानंतर टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय म्हणजे केवळ संघाचे यश नसून स्वतःला दिलेले एक वचन पूर्ण झाल्याचे त्याने म्हटले आहे.

हार्दिकने या स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत 9 विकेट घेतल्या आणि दोन महत्त्वपूर्ण अर्धशतकेही झळकावली. “अहमदाबादमधील हा विजय माझ्या जिद्दीचा पुरावा आहे आणि ही तर फक्त सुरुवात असल्याचे हार्दिक म्हणाला. 2024 च्या विश्वचषकापूर्वीचा काळ माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होता. वैयक्तिक आयुष्यातील अडचणी आणि मैदानावरील खराब फॉर्ममुळे सतत माझ्यावर टीका व्हायची. तेव्हा मी ठरवलं, आता 2024 मध्ये पुनराहमन करायचं. आणि मी करून दाखवलं, असे हार्दिक म्हणाला. 2017 पासून हिंदुस्थान हुलकावणी देणारी आयसीसी ट्रॉफी 17 वर्षांनंतर पुन्हा मायदेशात आणण्यात हार्दिकचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याने 7.64 च्या इकॉनॉमी रेटने 11 गडी बाद केले आणि फलंदाजीत 144 धावांचे योगदान दिले.

मी केवळ वैयक्तिक रेकॉर्डसाठी खेळत नाही तर, तर देशाला ट्रॉफी जिंकून देण्यासाठीच क्रिकेट खेळतो. मी प्रत्येक स्पर्धेत ट्रॉफी उचलण्याचे लक्ष्य समोर ठेवूनच मैदानात उतरतो, असे यावेळी हार्दिकने स्पष्ट केले. 2024 च्या जेतेपदाने त्याच्या कारकिर्दीला एक नवी दिशा दिली असून, भविष्यातील सर्व आयसीसी स्पर्धा जिंकण्याची त्याची इच्छा आहे.

टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद कायम राखणारा (Defending Champions) हिंदुस्थान हा पहिला संघ ठरला आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर, हिंदुस्थानने आता आपल्या खात्यात एकूण तीन टी-२० विश्वचषक जमा केले आहेत. हार्दिकच्या मते, टीम इंडियाचे हे सुवर्णयुग असून आगामी काळात टीम इंडियाचे वर्चस्व असेच टिकून राहील.

आयसीसीच्या टी-20 वर्ल्ड कप संघात चार हिंदुस्थानी; सॅमसन, बुमरा, ईशान व पंड्याचा समावेश