
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेता हार्दिक पटेल याला आगामी लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिकची 2015 च्या दंगल प्रकरणातील शिक्षा रद्द करण्यास नकार दिल्याने तो निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे यावर्षीही हार्दिकचे लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले आहे.
Gujarat High court rejects Congress leader Hardik Patel’s plea seeking suspension of his conviction in a rioting case of 2015 in Mehsana. As per the Representation of the People Act, 1951, Hardik Patel won’t be able to contest the upcoming Lok Sabha Election due to his conviction pic.twitter.com/qmiuGwHMa3
— ANI (@ANI) March 29, 2019
2015 च्या मेहसाणा दंगलीच्या वेळी भाजपचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. त्या प्रकरणी हार्दिकला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा रद्द व्हावी यासाठी हार्दिकने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हार्दिकची ही याचिका फेटाळून लावली आहे.
काही दिवसांपूर्वीच हार्दिकने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला काँग्रेसकडून जामनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात येणार होते. 2014 मध्ये हार्दिक पटेलचे वय कमी असल्याने त्याला लोकसभा निवडणूक लढवता नव्हती आली.




























































