लग्नात डीजे बंद करण्यावरुन झाला वाद, नवरदेवाच्या भावोजींनी केले भयंकर कृत्य

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वरातीत डीजे बंद करायला सांगितल्यावरुन डीजे संचालक आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये वाद झाला. नंतर वाद इतका वाढला की, नवरदेवाच्या भावोजींनी डीजे ऑपरेटरच्या वडीलांवर गोळीबार केला. या घटनेने एकच खळबळ उडाली.

हरदोई जिल्ह्यात गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा दु:खात बदलला. लखनऊवरुन आलेली वरात डीजे बंद करण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. रात्री 12 वाजता डीजे बंद केल्यावर नवरदेवाच्या भावोजींनी तो पुन्हा सुरु करायला सांगितला. मात्र डीजे वाल्याने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादात नवरदेवाच्या भावोजीने डीजे संचालकाच्या वडिलांवर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर नवरदेवाचा भावोजी आणि त्याचा भाऊ गाडी घेऊन पळून गेले. गोळी लागलेल्या डीजे संचालकाच्या वडिलांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिचती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धान घेतली आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. डीजे ऑपरेटरच्या तक्रारीवरून, पोलिसांनी वराचा भावोजी आणि गोळीबार करणाऱ्या त्याच्या भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीची गाडी जप्त केली आहे आणि त्यांना अटक करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. तणाव लक्षात घेता गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.