हरिश्चंद्र घवाळी यांचे निधन

सामना ऑनलाईन,मुंबई

हरिश्चंद्र शिवराम घवाळी यांचे आज दुपारी एकच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दैनिक ‘सामना’चे वरिष्ठ लिपिक संदीप घवाळी यांचे ते वडील होत.

हरिश्चंद्र घवाळी यांचा अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता. त्यांनी विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. त्यांच्या पार्थिवावर चकाला येथील पारशीवाडा वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि स्थानिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान, त्यांचा दशक्रिया विधी 17 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे सकाळी 7 वाजता तर बारावे आणि तेरावे 19 ऑक्टोबर रोजी त्यांच्या अंधेरीतील राहत्या घरी होणार आहे.