
राज्यसभेच्या उपसभापती संयुक्त जनता दलाचे नेते व विद्यमान उपसभापती हरिवंशसिंग यांची आवाजी मतदानाने फेरनिवड झाली. या निवडणुकीत हरिवंश हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार होते तर काँग्रेससह विरोधी पक्षाने राष्ट्रीय जनता दलाच्या मनोज झा यांना उमेदवारी दिली होती. ओडिशाच्या बिजू जनता दलानेही हरिवंशसिंग यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने हरिवंश यांचे पारडे जड झाले होते. आवाजी मतदानाने झालेल्या निवडीत हरिवंश यांनी बाजी मारली.



























































