हर्णे बायपासवरील विद्युत रोहित्राच्या ठिकाणची फ्यूज बॉक्स पेटी उघडी, महावितरण बेफीकीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हर्णे बायपास येथील विदयुत वाहक लाईनवर बसविण्यात आलेल्या 100 के.व्ही. रोहीत्राच्या ठिकाणची फ्यूज बॉक्स पेटी उघडी ठेवण्यात आली आहे. या उघड्या ठेवण्यात आलेल्या फ्युज बॉक्स पेटीतील फ्युजला एखाद्याचा स्पर्श झाल्यास शॉक लागण्याचा अधिक संभव आहे शॉक लागून बळी जाण्याआधी विद्युत महावितरण कंपनीने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

दापोली तालुक्यात हर्णे बायपास येथून पुढे जाणाऱ्या विद्युत वाहक सप्लायच्या विद्युत वाहक लाइनवर एका ठिकाणी रोहीत्र बसविण्यात आले आहे. या रोहीत्राच्या ठिकाणी एक फ्युज बॉक्स पेटी बसविण्यात आलेली आहे. ही फ्युज बॉक्स पेटी पुर्णपणे उघडी ठेवण्यात आली आहे. हे ठिकाण हर्णे बायपास मार्गावर असून या मार्गालगत मोठे पठारही आहे येथे उगवलेल्या गवताचा चारा खाण्यासाठी दररोज अडखळ, पाजपंढरी, हर्णे येथील शेतकरी आपली गुरे बकऱ्या, शेळया गवत चारा खायला सोडतात. काही वेळा गुराखी सोबत नसतात. तर बऱ्याचदा गुरांसोबत गुराखीही असतात. न जाणो उघड्या फ्युज बॉक्स पेटीशी नकळत एखाद्याचा संपर्क आलाच तर शॉक लागुन जीव गमवण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे उघडी ठेवण्यात आलेली फ्युज बॉक्स पेटी बंद करून विद्युत महावितरण कंपनीने गुरे ढोरे तसेच माणसांच्या जीवाची काळजी घ्यायला हवी नाही तर एखाद्या दिवशी एखाद्याचा नाहक बळी जावून विदयुत महावितरण कंपनीला आपल्याच चुकीमुळे मोठ्या गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.