हरनूलच्या जवानाचे श्रीनगरला निधन

चांदवड तालुक्यातील हरनूल येथील सैन्य दलातील जवान विकी अरूण चव्हाण (24) यांचे श्रीनगरला कुस्ती सरावावेळी निधन झाल्याने जिह्यावर शोककळा पसरली आहे.

शेतकरी कुटुंबातील विकी चव्हाण हे तीन वर्षांपासून सैन्य दलात कार्यरत आहेत. ते सध्या श्रीनगरला कर्तव्यावर होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. विकी यांचे पार्थिव उद्या रविवारी सकाळी नाशिक येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर मूळ गावी हरनूल येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.