
>> हर्षवर्धन दातार
चित्रपटात कथानकाच्या अनुषंगाने त्यातील भूमिकांमध्ये काही व्यवसाय, कामधंदे अंतर्भूत असतात. त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि धंदे व व्यवसायाशी निगडित अशी काही गाणी त्या भूमिकांचा, चित्रपटाचा अविभाज्य भाग असतात. या गाण्यांतून कथानक पुढे सरकतं आणि श्रोत्यांनाही एक वेगळा आनंद मिळतो. अशाच 1960 च्या दशकापर्यंतच्या चित्रपटांमध्ये त्या काळाचं भावुक दर्शन घडवणाऱ्या काही निवडक गाण्यांचा घेतलेला हा मागोवा.
काही दिवसापूर्वी ‘नवरंग’ चित्रपटातलं चितळकरांच्या (सी. रामचंद्र) आवाजातलं भरत व्यासलिखित गमतीशीर गाणं ‘धंदे की कुछ बात करो, कुछ पैसे जोडो’ ऐकलं आणि विचारपा सुरू झालं. चित्रपटात कथानकाच्या अनुषंगाने यातील भूमिकांमध्ये काही व्यवसाय, कामधंदे अंतर्भूत असतात. उदाहरणार्थ फुलं किंवा भाजी पोते, रस्त्यावर खेळ करणारे डोंबारी, रेल्वेतून भीक मागणारे अपंग, पोस्टमन, हमाल इत्यादी. त्यापुढे जाऊन बघितलं तर ‘व्यावसायिक’ भूमिकांवर अनेक गाणीसुद्धा चित्रित झाली आहेत. काही गाणी स्टेज
परफॉर्मन्सच्या माध्यमातून दिसतात तर काही गाणी त्या भूमिकांचा अविभाज्य भाग असतात. या गाण्यांतून कथानक पुढे सरकतं तसंच श्रोत्यांनाही एक वेगळा आनंद मिळतो. मनोरंजन होतं. आज मागोवा घेऊया अशा काही निवडक गाण्यांचा.
1949 मध्ये ‘दरोगाजी’ चित्रपटात फुलं आणि गजरे विकणारी नायिका नर्गिसवर संगीतकार बुलो सी. इराणीचं शमशाद बेगमनी गायलेलं ‘ले जा बाबू ये मेरी निशानी’ लयबद्ध ठेका असलेले गाणं आहे. अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या भूमिका असलेल्या अछूत कन्या (1936) मधील ‘चुडी मै लाइ अनमोल रे’ आणि ‘आबरु’ (1943) मधील सीतारा देवीचं ‘पुना से लायी पान रे’ ही गाणी स्टेज परफॉर्मन्सची आहेत. याच कडीतलं ‘जादू’ (1951) मधील रफी-शमशाद आणि जोहराबाई यांचं
‘ले लो फुल दो जानी’ संगीतकार आहेत नौशाद. चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळातली ही गाणी साचेबद्ध आणि ठराविक चाल असलेली होती. विषयसुद्धा फुल किंवा बांगडय़ा हे त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीला धरून होते. ‘पापी’ (1953) मध्ये राजकपूर बांगडी पोता आहे आणि तो रफीच्या (चक्क!) आवाजात गात आहे ‘ले ले गोरी पहनले चुडी’ हे राजा मेहेंदी अली खान आणि एस मोहिंदर या अति दुर्मिळ गीत-संगीतकार जोडीचं गाणं.
1955 च्या सोहराब मोदी दिग्दर्शित ‘कुंदन’मध्ये चरित्र अभिनेता ओमप्रकाश आणि मनोरमावर चित्रित सुधा मल्होत्रा व एस. डी. बातीशनी गायलेले वाहत्या ओघातले ‘आओ हमारे होटल मे’ हे गमतीदार युगल गाणं. ओमप्रकाशच्या विशिष्ट लकबी लक्षवेधक आहेत. मुख्य म्हणजे गंभीर प्रकृतीची गाणे लिहिणारे शकील बदायुनी गीतकार आहेत. ‘टांगेवाला’ (1955) मध्ये टांग्याच्या ठेक्यावर रफी त्यांच्या वेगळ्या खेळकर आवाजात गात आहेत ‘देखो टांगा मेरा निराला.’ गीतकार प्रेमधवन आणि संगीतकार आहेत सलील चौधरी. मधेच सुरावट आपल्याला ‘है अपना दिल तो आवारा’ची आठवण करून देते. शिवाय ऐकताना आठवण येते 1958 च्या ‘कभी अंधेरा कभी उजाला’ यातले ‘सुरमा मेरा निराला’ या मजरूह-ओपी नय्यर जोडीच्या गाण्याची. किशोर कुमारनी या गाण्यात आपल्या हरफनमौला योडेलिंग स्टाईलनी धमाल उडवून दिली आहे. ‘बंदिश’ (1955) मध्ये आपले भगवान दादा रफीच्या आवाजात ‘ले लो जी गुब्बारे’ गात फुगे विकत आहेत. शब्द राजा मेहंदी अली खान यांचे नेहमीच्या स्वभावाला विपरीत. संगीत हेमंत कुमार. 1954 च्या पौराणिक ‘पाधर’मध्ये शमशाद बेगम गात आहे ‘आज मै बेच रही भगवान’ हे कवी प्रदीपचे शब्द आणि अविनाश व्यास यांचे संगीत. पडद्यावर आहे चक्क देव (मूर्ती) विकणारी निरुपा रॉय (पुढील काळातली प्रचलित माँ). गाण्यात तुणतुणे आणि ढोलकी सुंदर वाजली आहे. ‘नया अंदाज’(1956) मधील ‘चुसो ठंडी गंडेरीया, ले लो गरम गरम जलेबिया’ हे किशोर -शमशादचे गाणे गाताना पडद्यावर दिसतात खुद्द किशोर आणि मीनाकुमारी. ओ.पी. नय्यरचे संगीत असलेल्या या गाण्याला शब्द दिले आहेत पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वभावाला विपरीत असे जान निस्सार अख्तरनी. ग. दि. माडगूळकरांच्या कथेवर आधारित 1956 चा अप्रतिम प्रेरणादायक उदात्त चित्रपट ‘तुफान और दिया.’ भरत व्यास – वसंत देसाई – मन्ना डे यांचं ‘निर्बल से लडाई भगवान की, ये कहानी है दिये कि और तुफान की’ हे गाणं अतिशय गाजलं. याच चित्रपटात गीता दत्तचं सतीश व्यासवर चित्रित ‘आया रे आया भाजीवाला’ हे तबल्याचा सुंदर ठेका असलेलं गाणं अतिशय श्रवणीय आहे. रफी ऐकवतायेत पानाचे अनेक फायदे. ‘टॅक्सी स्टॅन्ड’ (1958) च्या ‘आना ओ भाईजान खिलावू पान’ या गाण्यात. मजरूहच्या भन्नाट शब्दांना ड्रम्ससकट थोडीसी पाश्चात्त्य पद्धतीची चाल लावली आहे संगीतकार चित्रगुप्तनी. वाद्यमेळात आपल्याला ‘इना मीना डिका’ या प्रसिद्ध गाण्याची हलकीशी झलक दिसते. सट्टा बाजार (1959) मध्ये ‘आकडे का धंदा’ या गुलशन बावरा लिखित गाण्यात पडद्यावर जॉनी वॉकर जुगाराचे दुष्परिणाम दाखवून देतात. माया (1961) या संगीतप्रधान चित्रपटात ‘जिंदगी है क्या सुन मेरी जान’ हे आइपीम पोता देव आनंद आणि बच्चे मंडळींवर चित्रित गाणं. देव आनंदच्या गाडीतलं आइपीमइतकंच मजरूह-सलील चौधरी- रफी ह्या चौकडीचं हे गाणंही अतिशय गोड़ आहे. सन ऑफ इंडिया (1962) यात पोरगेलासा साजिद खान पेपर विकत म्हणतो ‘आज कि ताजा खबर.’ शकील बदायुनीचे शब्द आणि नौशादचे संगीत, आवाज आहे शांती माथूरचा. मात्र त्याच्या वयाच्या मुलाकडून जीवनाचं तत्त्वज्ञान पचनी पडत नाही.
मुंबईसारख्या गर्दीच्या आणि सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी भेळपुरी, चाट, बूटपॉलिश, व्हिक्टोरिया चालक हे व्यवसाय किफायतशीर तर आहेतच, शिवाय चित्रपटातही लोकप्रिय आहेत. अशा या व्यवसायांवर चित्रित गाण्यातून त्याकाळच्या जुन्या मुंबईचं भावुक दर्शन घडतं. 1954 साल राज कपूरच्या फिल्मफेअर पुरस्कृत ‘बूटपॉलिश’ या चित्रपटाने गाजवलं. चरित्र अभिनेता डेव्हिड, बेबी नाझ आणि बच्चे कंपनीवर चित्रित गीतकार शैलेंद्र – संगीतकार शंकर जयकिशन आणि मन्ना डे – आशा भोसले व मधुबाला झवेरीनी गायलेलं ‘ठहर जरा ओ जानेवाले’ या गाण्यांमधून समाजाला सचोटीचा एक संदेशही दिला गेला. चित्रपटातील धंदे, व्यवसाय या कडीतलं बहुधा सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे प्यासा (1957) मधलं ‘सर जो तेरा चकराये.’ पडद्यावर तेल मालिशचा व्यवसाय करणारे जॉनी वॉकर गात आहेत साहिर लिखित आणि सचिन देव बर्मन यांचं संगीत असलेलं हे अजरामर गाणं. त्याकाळचं मुंबई दर्शन ही या गाण्याची एक महत्त्वाची बाजू. सर्व प्रकारची मानसिक आणि शारीरिक दुःखं यावर रामबाण इलाज म्हणजे तेल मालिश आणि हे गाणं. कारीगर (1958) मध्ये एक धमाकेदार गाणं आहे. पंजाबी भांगडा आणि आपला पोवाडा हे प्रकार एकत्रित करून ‘बामन हो या जाट, भिकारी हो या सम्राट’ हे चौपाटीवरची भेळपुरी व चाट पोत्यांचं धमाल गाणं गात आहेत संगीतकार सी. रामचंद्र आणि रफी. पडद्यावर आहेत धुमाळ, कथना आणि मुंबईची पब्लिक. जबरदस्त ताल, गती व ठेका असलेल हे गाणं त्यावेळी नक्कीच लोकप्रिय झालं असेल. शिवाय पडद्यावर त्यावेळच्या मुंबईचं दर्शनही घडतं. कारीगर (1958) याच चित्रपटात आशा भोसले आणि उषा मंगेशकर भगिनींनी गायलेलं ‘बूट चप्पल संडल मर्दाना या जनाना’ हे मार्चिंग ठेका असलेलं गाणं ऐकण्यासारखं आहे. तेल मालिश बूट पॉलिश (1961) मध्ये अजून एक वाहत्या लयबद्ध ओघाचं गाणं मुकेश आपल्या सच्च्या आणि प्रामाणिक आवाजात गात आहेत ‘एक आना बूट
पॉलिश, दो आना तेल मालिश.’ गीतकार प्रेम धवन आणि संगीतकार चित्रगुप्त. पडद्यावर आहेत शेख मुख्तार. साचेबद्ध सरळसोट चाल आणि ठराविक पेटी, ढोलकी, तबला असा वाद्यमेळ साज असलेली ही गाणी आपल्याला त्यावेळच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांची आठवण करून देतात. 1960 च्या दशकापर्यंत असलेल्या धंदे आणि व्यवसायाशी निगडित अनेक चित्रपटगीतांपैकी काही निवडक गाण्यांचा आपण आजच्या भागात मागोवा घेतला. पुढील भागात बघूया 1970 आणि पुढील काळातील या प्रकारची गाणी व त्यातील प्रकर्षाने जाणवणारे बदल.
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)






















































