हरयाणात मतमोजणीस सुरुवात, भाजप आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. महाराष्ट्रात 60.46% तर हरयाणामध्ये 65.75% मतदान झाले . आज दोन्ही राज्यात मतमोजणीस सुरुवात झाली असून. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुती आघाडीवर असून हरयाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे.

हरयाणात 90 पैकी 45 जागांवरील मतमोजणीचे आकडे समोर आले आहे. यानुसार भाजप 31, काँग्रेस 11, जेजेपी 2 आणि इतर एका जागेवर आघाडीवर आहे. माजी मुख्यमंत्री हुड्डा आणि भाजपचे मुख्यमंत्री व उमेदवार मनोहर लाल खट्टर आपल्या मतदारसंघात पुढे आहे. तर दुष्यंत चौतालादेखील आघाडीवर आहेत. सद्यपरिस्थितीनुसार भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे.