लिंग बदल करून थाटलेला संसार मोडला, आता पाहिजे घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन । चंदीगढ

हरयाणामध्ये लिंग बदल करून दोन मुलींनी लग्न केले, मात्र आता त्यांना घटस्फोट पाहिजे आहे. पाच वर्षापुर्वी लिंग बदल करून दोन मैत्रीणींपैकी एक जण पुरुष झाला आणि दोघींनी लग्न केले. लग्नानंतर दोघांनी एक अडीच वर्षाच्या मुलाला दत्तक देखील घेतलं. मात्र दोघांनी थाटलेला संसार अर्ध्यावरच मोडला आहे. दोघींनीही आता जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी कार्यालयात घटस्फोटाची मागणी केली आहे.

हरयाणाच्या सोनिपत येथील रहिवासी महिलेने तक्रार केली आहे कि, तिची जींद जिल्ह्यातील पटियाला चौक परिसरात राहणाऱ्या एका तरूणीसोबत मैत्री झाली. पाच वर्ष अगोदर त्या मैत्रीणीने लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून पुरुष बनली आणि यानंतर दोघांनी लग्न केले व पती पत्नी बनून एकत्र राहू लागले. मात्र लग्नानंतर पुरुष बनलेली मैत्रीण काहीच कामधंदा करत नसल्याने तक्रारदार महिलेसमोर घर कसे चालवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे दोघांमध्ये वाद होत असल्याने शेवटी घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे. याबाबात सुनावणीसाठी दोघांनाही जिल्हा महिला संरक्षण कार्यालयात बोलावले असल्याचे सहाय्यक अधिकारी रवी लोहान यांनी सांगितले आहे.