Video – हे खुळं कायपण बोलतंय, हसन मुश्रीफ यांचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सत्ता गेल्याने फार अस्वस्थ आहेत. आताही ते अशी विधाने करीत आहेत. त्यामुळे आघाडीबाबतचे आत्ताचे त्यांचे विधान म्हणजे या वर्षीचा जगातील सर्वांत मोठा विनोद असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. दरम्यान, ‘हे खुळं कायपण बोलतंय म्हणून प्रसारमाध्यमांनी त्यांची दखलसुद्धा न घेता अवहेलनाच केली,’ अशा वक्तव्याचा मुश्रीफ यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी मुरगुड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर तोफ डागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरी बसविण्यास महाआघाडीतील काहीजण प्रयत्नशील असल्याचे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे या वर्षाचा जगातील सर्वांत मोठा विनोद आहे. माजी पालकमंत्री व भाजपमधील दोन नंबरचे असलेले माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सत्ता गेल्याने फार अस्वस्थ असल्याचे यापूर्वीही आपण सातत्याने सांगितले आहे. आताही ते अशी विधाने करीत आहेत. ‘हे खुळं कायपण बोलतंय म्हणून प्रसारमाध्यमांनी त्यांची दखलसुद्धा न घेता अवहेलनाच केली,’ असा टोलाही त्यांनी लगाविला.