मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम पाहून डोळे पांढरे होतील, हसन मुश्रिफ यांचा फडणवीसांना टोला

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील सर्वात मोठी व्य़वस्था मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अल्पकाळात उभारण्यात आली. राज्यात दौरे करत फिरणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम एकदा डोळ्यांखालून घालावे. हे भव्य काम पाहून त्यांचे डोळे पांढरे होतील, असा टोला ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज लगावला.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नगर येथे पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाला लगाम लाकण्यासाठी शासन-प्रशासन मोठय़ा जिद्दीने लढा देत आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टीसारख्या ठिकाणी सध्या फक्त एक पॉझिटिव्ह निघत आहे. महापालिका प्रशासनाकडून पुढील महिन्यापर्यंत कोरोनाला घालवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र विरोधी पक्षनेते फडणवीस मोठय़ा थाटात सांगतात की कोरोनाची परिस्थिती असताना महाविकास आघाडी एकमेकांत लढण्यात धन्यता मानते. म्हणजे काय आमची मारामारी सुरू झाली का, असा सवाल करतानाच फडणवीसांना काही काम दिसत नाही, त्यांनी कोरानाची परिस्थिती बाहेर फिरून स्वतःच्या डोळ्यांनी पाहावी, असाही टोला मुश्रीफ यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या