
सामना ऑनलाईन, अमरोहा
क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहान हिने रविवारी शमीच्या अलीपूर येथील घरात घुसून धुडगूस घातला. तिने शमीच्या घरात जबरदस्तीने घुसून तोडफोड केली. ‘शमी माझा पती असल्यामुळे हे माझे घर आहे. या घरात मी कधीही येऊ जाऊ शकते. मला आणि माझ्या मुलींना या लोकांनी जबरदस्तीने बाहेर काढले आहे.’ शमीच्या आईने फोन करून पोलिसांना बोलावल्यावर तिला शांतता भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. सत्र न्यायालयासमोर उभे केले असता तिला जामीन मिळाला.




























































