
‘होऊ द्या चर्चा’ अभियानाला हातकणंगले लोकसभा मतदासंघापैकी शाहूवाडी तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेले दोन दिवस शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान गावोगावी संपन्न होत असून सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱया अनेक समस्यांचा ऊहापोह या माध्यमांतून सुरू आहे.
जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या संयोजनाखाली शाहूवाडी तालुक्यातील सरुड, भेडसगांव, वारुण शिराळे, निनाई परळे, कडवे, वरेवाडी, नांदगाव, पेंडागळे, सावे, पिशवी, शित्तूर तर्फ मलकापूर येथे ‘होऊ द्या चर्चा’ अभियानअंतर्गत कोपरा सभा संपन्न झाल्या.
केंद्र व राज्य सरकारने नुसत्या घोषणा व योजनांचा पाऊस पाडला आहे. सरकार इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात मग्न असून मायबाप जनतेकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. काही निवडक उद्योगपती व भांडवलदार यांचे दलाल म्हणून देशातील सध्याचे सरकार कार्यरत असल्याची टीका उपनेते तथा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केली. तर उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी सरकारच्या विविध घोषणा व त्यातील नाकर्तेपणाबद्दल सडकून टीका केली.
जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सत्यजित पाटील, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पोवार, विधानसभा संपर्कप्रमुख आनंद भेडसे, हंबीरराव पाटील, जालिंदर पाटील, अमरसिंह पाटील, निवास कदम, विजय लाटकर, दीप्ती कोळेकर, अलका भालेकर, पूनम भोसले यांच्यासह शिवसैनिक व नागरिक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भाजपचे अपयश घराघरापर्यंत पोहोचवा

खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणाऱया भाजपचे अपयश घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी केले. सोलापुरात आयोजित होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या योजनांचा भंडाफोड करण्यासाठी शिवसेनेतर्फे रथ तयार करण्यात आला आहे. या रथाचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, अजय दासरी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती, युवासेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, शरणराज केंगनाळकर, शहर संघटक अतुल भंवर, धर्मराज बगले, योगिराज पाटील, आनंद थोरात, राजकुमार कोळी, सुनील शिंदे, विश्वनाथ गंगटे, सुरेश शेंडगे, विभागप्रमुख जयराज सुंचू, सचिन माने, देविदास कोळी यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

माढा लोकसभेत कळबंद तालुका येथे ‘होऊ द्या चर्चा’ उपक्रमाचे आयोजन केले होते. माढा लोकसभाचे निरीक्षक अशोक पटेल, राहुल चव्हाण, विधानसभा प्रमुख उत्तम बारबोळे, पंढरपूर प्रमुख उमेश काळे, रणजीत बागल, विजय मांडाळकर तसेच तालुक्यातील शिवसैनिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

ईशान्य मुंबई शिवसेना शाखा 122 च्या वतीने पवईतील चैतन्यनगरला आयोजित ‘होऊ द्या चर्चा’ या मोहिमेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत, उपविभाग संघटक डॉ. स्नेहल मांडे, शाखाप्रमुख सचिन मदने, शाखासंघटक सुषमा आंब्रे, विधानसभा संघटक विजयंता परब, कार्यालय प्रमुख विजय परब, ज्येष्ठ शिवसैनिक शंकर पार्टे यांच्यासह युवासेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 130 च्या वतीने घाटकोपर रेल्वे स्थानक येथे ‘होऊ द्या चर्चा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शाखाप्रमुख रोहिदास ताठेले यांनी शासनाच्या बोलघेवडय़ा योजनेचा भंडाफोड करून भाजपने देशातील प्रत्येक माणसाची कशा प्रकारे फसवणूक केली हे जनतेला उदाहरणासहित समजावून सांगितले. यावेळी घाटकोपर पूर्व विधानसभा प्रमुख अवी राऊत, भूषण चव्हाण, युवासेना मुंबई समन्वयक इम्रानभाई शेख, माजी नगरसेवक कुमार पांडे, पाटील, महिला विधानसभा प्रमुख कविता फर्नांडिस, शाखा संघटक नंदा काळे, शाखा समन्वयक सूर्यकांत शिंदे, युवासेना उपविभाग अधिकारी हेमंत वालझाडे, युवासेना शाखाधिकारी नीलेश येवले, ग्राहक संरक्षण कक्ष उपसंघटक प्रमोद चौंडकर, वॉर्ड संघटक संतोष भोईटे, उपशाखाप्रमुख विकास माने, हरेश यादव उपस्थित होते.
चंद्रपुरात फसव्या योजनांचा पर्दाफाश

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधील राजूरा व बल्लारपूर विधानसभेतील घनोटी तुकूम, सोनापूर, पोंभुर्णा, वढोली, अकासापूर गोंडपिपरी मूल, ऊर्जानगर या ठिकाणी ‘होऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाप्रमुख संदीप गिऱहे, जिल्हा संघटिका उज्वला नलगे, उपजिल्हा प्रमुख संदीप करपे, तालुकाप्रमुख आशीष कावटवार, सुरज माडूरवार, प्रशांत गट्टूवार, संतोष नरुले, विभागप्रमुख अनिल कोयाचे, महेश श्रीगरीवर, रितिक संगमावर, तृणाली धनरे, कुसुम उधार, निलिमा शिरे, सूर्यकांत पाटील, अमित जाधव उपस्थित होते.
ढिसाळ आरोग्य यंत्रणेला सरकार जबाबदार

राज्यातील विविध सरकारी रुग्णालयांत अचानकपणे होणारे रुग्णांचे मृत्यू हे सरकारच्या भोंगळ आणि ढिसाळ आरोग्य यंत्रणेमुळे होत आहेत, अशी टीका युवासेना कार्यकारिणी सदस्या शीतल शेठ-देवरुखकर यांनी केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या संयोजनाखाली ‘होऊ द्या चर्चा’ अभियान अंतर्गत इचलकरंजी एसटी स्टँड, स्वामी अपार्टमेंट, शहापूर चौक, जवाहर नगर, लिंबू चौक येथे कोपरा सभा संपन्न झाल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोना काळात जनतेचे पालक आहोत या भावनेतून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य यंत्रणा आणि व्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक ठोस निर्णय घेतले. परंतु सध्याच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे, असे शितल शेठ-देवरुखकर म्हणाल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, महेश बोहरा, शिवाजी पाटील, शिवाजी जाधव, शोभा गोरे, सतीश लाटणे, आप्पासो पाटील, बालाजी हुलेमणी, अक्षय शेट्टी उपस्थित होते.



























































