हातखंबा येथे फॉरच्युनर गाडीत सापडले पिस्तुल आणि जीवंत काडतुसे, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याकडे निघालेल्या एका फॉर्च्यूनर गाडीची पोलिसांनी तपासणी केली असता गाडीत एक पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुस सापडली. पोलिसांनी पिस्तुल,काडतुसं आणि गाडी जप्त करत दोघांना अटक केली आहे. हातखंबा येथे पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार फॉरच्युनर गाडीची तपासणी केली असता गाडीत 48 हज़ार 500 रूपये किंमतीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे सापडली.गाडीतील प्रेम बर्मा अलकुंटे वय 25 आणि सागर कुमार अलकुंटे वय 29 दोघेही रा.हडपसर पुणे यांना ताब्यात घेतले आहे. गाडीत तीन महिलाही होत्या. हे सर्व गोव्याला फिरायला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी फॉरच्युनर गाडी,पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे असा 15 लाख 58 हज़ार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शांताराम झोरे,प्रवीण खांबे,मिलिंद कदम,बाळू पालकर,अतुल देसाई यांनी केली.