इराणशी पंगा घेतला, आता ट्रम्प यांची टरकली; व्हाईट हाऊसखाली बंकर बनवण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेतील युद्धाला सुरवात झाल्यानंतर, इराणचे पूर्वीश्रमीचे नेते बंकरमध्ये लपले होते. त्यांच्या बंकरवर हल्ला करत अमेरिकेने त्यांना संपवले. परंतु आता खुद्द अमेरिकेलाच बंकर बांधण्याची वेळ आलेली आहे. व्हाईट हाऊसमध्ये आता ट्रम्प स्वतःसाठी बंकर बांधत आहे. त्यामुळेच या गोष्टीची चर्चा आता सर्वदूर होऊ लागली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या त्या भागाचा फोटो दाखवला आहे, ज्याखाली ‘बेसमेंट’ बांधले जात आहे. याला व्हाईट हाऊस बॉलरूम म्हटले जात आहे.

एअर फोर्स वनमधून ट्रम्प यांनी सांगितले की, हे काम वेळेच्या आधी आणि ठरलेल्या बजेटमध्ये पूर्ण होईल. ईस्ट विंगच्या जागेवर व्हाईट हाऊसचा बॉलरूम बांधला जात आहे. त्याची रचना वाढीव सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. खुद्द ट्रम्प यांनी पत्रकारांना एक चित्र दाखवून स्पष्ट केले की, ते बुलेटप्रूफ आणि ड्रोन-प्रूफ असेल, म्हणजेच गोळी काचेत अडकून राहील, ज्यामुळे ड्रोन हल्ले करणे कठीण होईल. छतांची रचनाही अशाच प्रकारे केली जात आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, तिथे बुलेटप्रूफ काचेच्या खिडक्या आणि ड्रोन-प्रूफ छत असतील. या ‘बंकर’मुळे राजकीय आणि कायदेशीर वादही निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी सांगितले आहे की, या प्रकल्पाचा खर्च खाजगी देणग्यांमधून भागवला जाईल.

व्हाईट हाऊसखाली एक मोठे लष्करी संकुल बांधले जात आहे, जिथे महत्त्वाच्या बैठकांव्यतिरिक्त मोठे कार्यक्रमही आयोजित केले जातील. हा बाॅलरुम आधुनिक हल्ले आणि धोके सहन करण्यायोग्य असल्याचे म्हटले जात आहे. बॉलरूमच्या अगदी खाली असलेल्या लष्करी तळाबद्दल फारशी माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. तो २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यात अंदाजे १ हजार लोक बसू शकतील. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी कोणताही सरकारी निधी वापरला जात नाही.