वल्दारीस कोठडीतील मृत्यू प्रकरण: स्टेशन डायरी कोर्टात सादर करण्याचे सीबीआयला आदेश

501

वडाळा पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयवर मुंबई उच्च न्यायालयाने आज ताशेरे ओढले. अग्नेलो वल्दारिस या पंचवीस वर्षांच्या युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे झाला नसल्याचा ठपका ठेवत हायकोर्टाने सीबीआयला झापले तसेच पुढील सुनावणीवेळी स्टेशन डायरी कोर्टात सादर करा असे आदेश दिले.

आरोपपत्रात नोंद नाही

सीबीआयकडून बाजू मांडताना कोर्टाला सांगण्यात आले की तपासामध्ये आरोपीचा मृत्यू अपघाती झाल्याचे उघड होत आहे, त्यावेळी आरोपीला रेल्वे न्यायालयात नेण्याची वेळ आरोपपत्रामध्ये आणि तपास नोंदीमध्ये केलेली नाही, अशी विचारणा हायकोर्टाने केली. स्टेशन डायरीमध्ये याची नोंद असायला हवी, त्याबाबत काय, असेही खंडपीठाने विचारले. मात्र समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. यावरून हायकोर्टाने खडसावत सुनावणी 21 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

मोबाईल चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या अग्नेलो वल्दारिस याचा 18 एप्रिल 2014 साली कोठडीत मृत्यू झाला. मात्र आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळालगत आढळला असून अपघाती मृत्यूची पोलिसांनी नोंद केली. पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळेच आपल्या मुलाचा बळी गेला असा आरोप करत अग्नेलो याचे वडील लिओनार्द यांनी नुकसानभरपाई तसेच संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या