एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्विस शनिवारी बंद

एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्विस शनिवारी बंद देशात सध्या यूपीआयवरून पेमेंट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेच्या सिस्टम मेंटेनन्समुळे 8 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत यूपीआय सर्विस बंद असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या तीन तासात यूपीआयवरून पेमेंट करणे टाळावे, असे बँकेने म्हटले आहे. या वेळेत एचडीएफसी बँकेच्या करंट आणि सेविंग अकाउंट सोबत रुपे क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल व्यवहार उपलब्ध राहणार नाहीत, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.