एचडीएफसीचे ग्राहक संभ्रमात, बँकेने पासबुकवर छापलं एक लाखाच्या ठेवीवर विमा संरक्षण

1450

पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या अनियमिततामुळे आरबीआयने त्या बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे लाखो ग्राहकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता एचडीएफसी बँकेने पासबुकवर एक लाख रुपयांच्या ठेवीवरच विमा संरक्षण देण्यात येईल असे छापले आहे. यामुळे एचडीएफसीचे ग्राहक संभ्रमात पडले आहेत.

देशभरातील खासगी बँका सध्या आरबीआयच्या रडारवर आहेत. त्यातच पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध लावल्याने देशातील इतर खासगी बँक खातेदारकांची झोप उडाली आहे. केव्हा कुठली बँक बंद होईल हे सांगता येत नसल्याने खातेधारकांची चिंता वाढली आहे. त्याचेवळी देशातील सगळ्यात मोठी खाजगी बँक असलेली एचडीएफसी बँक खातेदारांच्या पासबुकवर एक लाख रुपयांच्या ठेवीवरच विमा संरक्षण देण्यात येईल असा स्टॅम्प छापून देत आहे. यात बँकेत रोख रकमेबाबत अडचण आल्यास एक लाख रुपयांपर्य़ंत विम्याचे कवच मिळेल असे नमूद करण्यात आले आहे. पासबुकवरील या मजकुराने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

या स्टॅम्पचा फोटो दीपक नावाच्या एका यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आधीच पीएमसी बँक घोटाळ्यामुळे खातेदारांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना एचडीएफसी सांगते की तुमच्या एक लाख रुपयांनाच बँक विमा कवच मिळणार आहे. पण खात्यातील बाकीच्या पैशांच काय. ते आमच्या कष्टाचे आहेत. असं दिपक कुमार याने म्हटलं आहे.

तर दीपक कुमार यांच्या या टि्वटची एचडीएफसीने दखल घेतली असून सध्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडीयावर बँकेशी संदर्भात जो काही मेसेज व्हायरल होत आहे.ती आरबीआयच्या निदर्शानुसारच असल्याचे बँकेने म्हटले आहे. तसेच २२ जून २०१७ रोजी आरबीआयने त्याच्या पत्रकात सर्व व्यावसायिक आणि आर्थिक उलाढाल कमी असणाऱ्या बँकाच्या पासबुकवर ठेवीवर मिळणाऱ्या विमा कवचाबदद्ल लिहण्याचे निदेस दिले होते. त्यानुसारच हे स्टॅम्प लावण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या