नशेत तर्र झालेल्या मुख्याध्यापकाचे शाळेतच महिलेसोबत अश्लील चाळे, गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं!

शाळा हे विद्येचं मंदिर आहे. पण शाळेचा मान न ठेवण्याचं कृत्य अनेकदा घडतं. अशीच एक घटना बिहारच्या कटिहार येथे घडली आहे. येथील एका शाळेत महिलेसोबत अश्लील चाळे करताना शाळेच्या मुख्याध्यापकाला रंगेहात पकडण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण

कटिहारच्या सेमापूर येथील उत्क्रमित उच्च विद्यालयात हा प्रकार घडला. या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव कमलेश्वरी दास असं आहे. कमलेश्वरी याला दारूचं व्यसन आहे. तो अनेकदा दारूच्या नशेतच राहतो. त्याच्या या व्यसनाबद्दल आणि स्त्रीलंपटपणाबाबत ग्रामस्थांना आधीच माहिती होती. मात्र, त्याला कधीच रंगेहात पकडता आलं नव्हतं.

पण, रविवारी ग्रामस्थांना ही संधी मिळाली. रविवारी तो एका महिलेसह शाळेत गेला होता. रविवारची शाळा उघडलेली पाहून गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी सरळ शाळेवर धाड टाकली.

शाळेतील केबिनमध्ये बेडरूम आणि आक्षेपार्ह साहित्य

गावकऱ्यांनी धाड टाकून कमलेश्वरीला एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना पकडलं. ही महिला त्याच गावची होती. गावकऱ्यांना पाहून ती तिथून फरार झाली. पण, गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला अडवून ठेवलं.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शाळेतील त्याच्या केबिनची तपासणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्याच्या केबिनमध्ये आत बेडरूम बनवण्यात आलं होतं. तिथे तीन लीटर देशी दारूचे कॅन आणि काही आक्षेपार्ह साहित्यही आढळलं.

मुख्याध्यापकाची पत्नी गावची पंच

कमलेश्वरी दास याची पत्नी चंद्रकला देवी ही गावच्या पंचांपैकी एक आहे. त्यामुळे आजवर कमलेश्वरी दास यांचे उद्योग गावाला माहीत असले तरी दरवेळी सारवासारव करण्यात येत होती. पण, आता रंगेहात पकडल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. पण, चंद्रकला देवी हिने नवऱ्याची पाठराखण केली असून नवऱ्याला या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचं तिचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या