
सामना ऑनलाईन । परळी
सेवेतून कार्यमुक्त केलेल्या लिपिकाने केलेल्या तक्रारीकर शिक्षणाधिकाऱ्यांसमोर विद्यमान लिपिकाची बाजू मांडण्यासाठी दोन लाखांची लाच मागून त्यापैकी दीड लाखाची रक्कम स्वीकारताना परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. मागील सलग तीन दिवसांत लाचखोरांकर केलेली ही चौथी कारकाई आहे.
2012 मध्ये वैद्यनाथ माध्यमिक किद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. याची चौकशी बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे सुरू आहे. या चौकशीत लिपिकपदासंबंधी बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. रक्कम न दिल्यास तुमची सेवा समाप्त करून पूर्वीच्या लिपिकास सेवेत पुन्हा रुजू करण्यात येईल, असेही मोदी याने विद्यमान लिपिकास बजावले होते. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेस प्राप्त झाली होती. या तक्रारीची खातरजमा करून पाळत ठेकली असता मुख्याध्यापक मोदी याने आज 1 सप्टेंबर रोजी दीड लाख रुपये स्वीकारण्याचे आणि उर्करित 50 हजार एक महिन्यानंतर स्वीकारण्याचे मान्य केल्याचे आढळून आले. त्यानुसार आज शनिवारी बीड एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याच्या पेठ गल्ली देशमुख पार येथील घराच्या परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे विद्यमान लिपिकाने दिलेली दीड लाखाची रक्कम स्वीकारताच मुख्याध्यापक मोदी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून रंगेहाथ पकडले. मुख्याध्यापक मोदी याची सेवानिकृत्ती अवघी सहा महिन्यांवर आली होती.
ही कारकाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक काघ, पोलीस कर्मचारी कल्याण राठोड, दादासाहेब केदार, मनोज गदळे, सखाराम घोलप, भरत गारदे, अशोक ठोकळ, किकास मुंडे, अमोल बागलाने यांनी
पार पाडली.



























































