दीर्घायुष्यावर भाषण देताना औषध कंपनीच्या अध्यक्षाचा स्टेजवरच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये औषध कंपनीच्या अध्यक्षाचा दीर्घायुष्यावर भाषण देताना मृत्यू झाला. चेन पीवेन (Chen Peiwen) असे त्यांचे नाव असून ते 65 वर्षांचे होते. दक्षिण चीनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात दीर्घायुष्यावर भाषण देत असताना चेन पीवेन स्टेजवरवरच कोसळले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, चेन पीवेन हे चीनमधील औषध कंपनी ‘झॉन्गयी हेल्थ अॅण्ड टेक्नॉलॉजी’चे अध्यक्ष होते. ते गुआंगडॉन्ग येथील रहिवासी होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ही कंपनी सुरू झाली . चेन झांगोझूमध्ये 17 नोव्हेंबरला कंपनीच्या प्रमोशन कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये चेन हे मंचावर भाषण देत असतानाच कोसळताना दिसत आहेत.

दरम्यान, ‘चेन त्यांचे भाषण संपताच कोसळले. चेन यांची 20 वर्षांपूर्वी एक हार्ट बायपास सर्जरी झाली होती. काही दिवसांनी ते रुग्णालयात तपासणीसाठी जाणार होते. मात्र, अचानक असं काही होईल याचा कोणी विचारही केला नसेल’, असे कंपनीचे संस्थापक वु तियानरॉन्ग यांनी सांगितले.