वयोमानापरतवे होणाऱ्या विस्मृतीवर हे आहेत खात्रीशीर उपाय, जाणून घ्या

वयोमानापरतवे  अनेक समस्या निर्माण होतात. यातील अनेक समस्या या जटील असतात. परंतु काही समस्यांची लक्षणे दिसताच त्यावर उपाय करणे हितावह असते. अशीच एक समस्या म्हणजे विस्मरणाची समस्या…

वयोमानानुसार वृद्धांची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. काही जण आपल्या कुटुंबातील लोकांना विसरू लागतात तर काही जण चक्क स्वत:च नावही विसरतात. अलिकडे मात्र वयोवृद्धांसह तरूणांमध्येही हा आजार आढळून येतोय. मेंदूला योग्य तितका रक्तपुरठा झाला नाही तर हा आजार होतो. पण हे एकमेव कारण नसून शरिरात विटामिनची कमतरता असेल तरी देखील स्मरणशक्ती कमकुवत होते.

विसरणे किंवा विचार करण्याची गती मंदावणे यांसारख्या समस्या व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे देखील होतात. व्हिटॅमिन B12 मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते.व्हिटॅमिन B12 हे मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. याच्या कमतरतेमुळे मेंदूमध्ये होमोसिस्टीनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मज्जातंतूंच्या पेशींवर याचा परिणाम होतो आणि विचार करण्याची क्षमता मंदावते.

वृद्ध , मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांना व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा धोका जास्त असतो. दीर्घकाळ वापरात असेलेली अ‍ॅसिड ब्लॉकर्स किंवा मेटफॉर्मिन सारख्या औषधांमुळे देखील धोका वाढवू शकतो. त्यामुळे याचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. विसरणे, सतत चिडचिड होणे किंवा हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे ही यामागची लक्षणे असू शकतात. हा आजार टाळण्यासाठी दूध, अंडी, चीज आणि मासे यासारखे पदार्थ खाल्ले पाहिजे.