
कोणताही आजार नसला तरीही हे करा…
– कर्करोगापासून वाचण्यासाठी नियमित कढीपत्त्याचा रस प्या.
-हृदयविकाराची भीती वाटत असल्यास नियमित अर्जुनारिष्ट किंवा अर्जुनासव प्या.
– मूळव्याध होऊ नये यासाठी दररोज सकाळी पानफुटीची पाने खा.
– मूत्राशयाचे विकार होऊ नयेत यासाठी दररोज सकाळी कोथिंबिरीचा रस रिकाम्या पोटी प्या.
– पित्त होणे टाळण्यासाठी नियमित आवळा रस प्या.
– सर्दी होऊ नये यासाठी नियमित कोमट पाण्यात हळद घालून प्या.
-टक्कल पडण्याची भीती वाटत असेल तर वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळून गाळून आंघोळीपूर्वी डोक्याला मालीश करा.
– मधुमेहापासून रक्षण होण्यासाठी तणावमुक्त जीवन जगा, व्यायाम करा, जागरण टाळा. साखर खाणे बंद करा. गूळ खा.
-भीतीमुळे झोप येत नसेल तर रात्री जेवणापूर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात घालून प्या.
– कोणत्याही प्रकारचा आजार नसला तरीही दररोज 15 मिनिटे अनुलोम विलोम, 15 मिनिटे कपालभाती, 15 मिनिटे सूर्यनमस्काराची 12 आवर्तन करावी. कोरा चहा प्या. जेवणात कच्च्या कोशिंबिरी खा.
– रिकाम्या पोटी हातपाय शेकवा. भरपूर ऐका मात्र कमी बोला.
-हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील ते पंपिंग करून दाब द्या. ध्यानधारणा करा.
-पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. (ऍक्यप्रेशर करा.) गरज असेल तरच घरगुती औषधे घ्या.
– आठवडय़ातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला मालीश करा. सकारात्मक वर्तन आणि विचार ठेवा.
-नियमित प्राणायाम करा. (भस्त्र्ाका, कपालभाती आणि अनुलोम-विलोम)
– सकाळी एक-दोन ग्लास कोमट पाणी प्या.
– वात, पित्त आणि कफ प्रकृती ओळखून उपचार करा.
-एकाचवेळी भरपेट खाऊ नका. सकाळी भरपेट नाश्ता सकाळी 8 ते 9 या वेळेत करा.
– दुपारी 1 ते 2 या वेळेत मध्यम आहार घ्या. डोकं शांत ठेवा. चौरस आहार घ्या.
– संध्याकाळी गरज असेल तरच जेवा किंवा हलका आहार घ्या. शक्यतो 7 ते 8 या वेळेत रात्रीचा आहार घ्या.



























































