उभ्याने जेवताय? अहो मग आरोग्याचं नुकसान करताय, वाचा सविस्तर…

3132

जेवण करण्याची आपल्याकडे आदर्श पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. जेवताना मांडी घालून बसावे आणि शांतपणे, 32 वेळा घास चावून खावा असे घरातील मोठी मंडळी बोलतात. पूर्वीच्या काळी सण, उत्सव, लग्न यासारख्या कार्यक्रमांमध्ये लोक जमिनीवर बसून जेवायचे. परंतु काळ बदलत गेला आणि लोक टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागले.

lunch

आता तर बऱ्याच ठिकाणी लोक उभ्याने जेवण करताना दिसतात. ‘बुफे’ पद्धत (buffet system) असे गोंडस नाव याला देण्यात आले. परंतु उभ्याने जेवल्याने काय नुकसान होते हे आपल्याला माहिती आहे का?

> उभ्याने जेवण केल्याने आरोग्याचे नुकसानच होते.

> उभे राहून जेवण घेतल्याने अपचन, लठ्ठपणा असे आजार उद्भवतात.

> उभ्याने खाल्ल्याने आपल्या शरीरातील आतड्या आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेले पचायला त्रास होतो, असा एक अहवाल सांगतो.

buffet-system1

> उभे राहून जेवताना आपल्या पायात बूट किंवा चप्पल असते ज्यामुळे आपले पाय गरम पडतात. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपले पाय थंड असणे आवश्य़क असते

> बुफेसारख्या पद्धतीत सारखे-सारखे रांगेत जावून जेवण घेण्यापेक्षा लोक एकदाच ताटात भरमसाठ पदार्थ वाढून घेतात. त्यामुळे काही वेळा आपण जास्त खातो आणि त्यामुळे अॅसिडिटी आणि लठ्ठपणासारखे त्रास होतात.

आपली प्रतिक्रिया द्या