Health Tips – रोज ही सात आठ पाने खाल तर कायम निरोगी राहाल

कढीपत्ता आणि फोडणी हे न तुटणारं समीकरण आहे. फोडणीसाठी कढीपत्ता हा खूपच गरजेचा आहे. कढीपत्त्याचा वापर आपल्या प्रत्येक घरात होतोच. परंतु हाच कढीपत्ता आपल्या सौंदर्यासाठीही तितकाच गरजेचा आहे. कढीपत्त्याने फक्त आपल्या जेवणाची लज्जत वाढत नाही तर, आपल्याला याव्यतिरिक्तही खूप पोषक घटक मिळतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कढीपत्ता हा रामबाण उपायापेक्षा कमी नाही. पचनासाठी कढीपत्ता हा खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच उपाशीपोटी कढीपत्ता खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. उपाशीपोटी कढीपत्ता खाल्ल्याने, आपली पचन क्रिया उत्तम राहते. यामुळे पोटात गॅस होण्याचे प्रमाण कमी होते.

Skin Care – सौंदर्यासाठी आता फक्त एकच बटाटा आहे पुरेसा, वाचा

वजन कमी करण्यासाठी सुद्धा कढीपत्ता हा खूप महत्त्वाचा मानला जातो. कढीपत्त्याची पाने कच्ची चावल्याने, आपल्या शरीरातील मॅटाबाॅलिजम वाढण्यास मदत होते. तसेच यामुळे भूक कमी लागते.

कोलेस्ट्राॅल कमी करण्यासाठी कढीपत्ता हा फार गरजेचा मानला जातो. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने, आपला हृद्याच्या आजारांपासून बचाव होतो. तसेच आपला रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

केसांसाठी कढीपत्ता हा खूपच गुणकारी मानला जातो. त्वचेला चमक येण्यासाठी, सुरकुत्या कमी होण्यासाठी कढीपत्ता हा खूप गरजेचा मानला जातो. कढीपत्ता रोज खाल्ल्याने, केस मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते.

कढीपत्त्यामध्ये आयरन आणि फोलिक भरपूर प्रमाणात असल्याने, रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. तसेच कढीपत्ता नियमितपणे खाल्लायमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

लिवर आणि किडनीसाठी कढीपत्ता हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी, तसेच कावीळीपासून बचावासाठी कच्चा कढीपत्ता खाणे उपयुक्त आहे.