टिप्स : समृद्ध माती

188

घराच्या सजावटीसाठी मातीची बरीच भांडी आपण घरामध्ये ठेवतो. स्वयंपाकघरातही मातीचे मोठे माठ असतेच. जुन्या काळात तर घरात बहुतांश मातीच्याच वस्तू असायच्या. पण त्यामागेही एक विशिष्ट शास्त्र्ा होते. घरात मातीची भांडी ठेवल्यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदते, सौभाग्य कायम राहाते असा तेव्हाही समज होताच. एकंदरीत मातीची भांडी घरात ठेवणे भाग्यशाली समजले जाते.

> थंड पाणी पिण्यासाठी घरात मोठे माठ असते. वास्तविक या माठाचा उपयोग केल्यामुळे आपल्यावर बुध आणि चंद्राचा प्रभाव पडतो. हा प्रभाव खूपच शुभ असतो.

> मातीच्या भांडय़ात पाणी भरून ते घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवले पाहिजे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असं म्हटलं जातं.

> मातीच्या भांडय़ातून पाणी प्यायल्यामुळे मानसिक समस्या असलेल्या रुग्णाला फायदा होतो.

> ज्यांना मंगळ ग्रहाची पीडा त्रास देते त्यांनी रोज मातीच्या भांडय़ांतून चहा, दूध किंवा ताक प्यायल्यास बराच चांगला फरक पडतो.

> पुराणात एक तोडगा देण्यात आला आहे. त्यानुसार दारिद्रय़ापासून मुक्ती मिळवायची असेल तर मातीच्या छोटय़ा भांडय़ात पाणी भरून त्ते पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे. या उपायाने दुर्भाग्य दूर होते म्हणतात.

> घरातील देव्हाऱ्यात देवाची मूर्ती ठेवायची तर ती मातीने बनवलेली असावी. कारण घरात मातीच्या मूर्तीची पूजा होते तेव्हा त्या घरात पैशाची भरभराट होते.

> पती-पत्नीमध्ये मतभेद असतील आणि सतत त्यांच्यात भांडणे होत असतील तर दोघांपैकी एकाने नियमितपणे संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ मातीच्या पणतीमध्ये तुपाचा दिवा लावायला हवा.

> ज्या दांपत्याला मूलबाळ नसेल त्यांनी दररोज श्रीकृष्णासमोर मातीच्या पणतीमध्ये चार वातींचा दिवा लावायला हवा. संतानप्राप्तीची इच्छा लवकरच पूर्ण होईल असे म्हटले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या