
बऱ्याचदा अचानक छातीत जळजळ होते. हे नेमके कशामुळे झाले आहे हे कळत नाही. अनेक जण घाबरून जातात. कधी कधी पोटातील ऑसिड अन्नमार्गात जाते. त्यामुळे छातीत जळजळ होते, परंतु असे होत असेल तर फार चिंता करण्याची गरज नाही.
जेवणानंतर लगेच वाकणे किंवा झोपणे टाळा. दिवसभरात भरपूर पाणी प्या. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने जळजळ कमी होते. आवळा खाल्ल्याने जळजळ कमी होते. तुळशीची पाने चघळल्याने छातीतील जळजळ कमी होते. जळजळ होऊ नये यासाठी कमी मसाल्याचे पदार्थ खा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा.