पावसाळ्यात तब्येत सांभाळायची आहे? मग हे पदार्थ आवर्जून खा!

2122

सामना ऑनलाइन | मुंबई 

पावसाळ्यामध्ये वातावरणात सतत बदल होत असतात. या बदलांमुळे हवेतील विषाणूंचे प्रमाण वाढते .त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, टायफाइड यांसारख्या  आजारांचे प्रमाण वाढते . हे टाळण्यासाठी पावसाळ्यात योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

लिंबू पाणी 

im-1पावसाळ्यामध्ये थकवा, चक्कर, आणि  पोटांचे विकार वाढतात. म्हणून लिंबू पाणी घ्यावे. लिंबू पाणी प्यायल्याने ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते तसेच मधुमेहासाठी फायद्याचे असते.

हलका आहार 

im2
पावसाळ्यामध्ये ताप, सर्दीसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. तापामुळे  जीभेची चव जाते. सगळे पदार्थ बेचव लागतात. अशावेळी  हलका आहार घ्यावा. त्यामध्ये वरण-भात खाल्ल्याने जीभेला चव येते तसेच ते पचायला सोपे असते.

कडधान्य 

im4पावसाळयात आहारामध्ये कडधान्याचा समावेश करावा. कारण कडधान्यातून प्रथिने, जीवनसत्वे मिळतात.

सूप im6

पावसाळ्यात गरम सूप पिल्याने थकवा जातो. तसेच सर्दी, ताप आणि डोकेदुखी दूर व्हायला मदत होते. त्यामध्ये असणाऱ्या पालेभाज्यांमधून व्हिटॅमिन सी मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या