
साधारणतः दहा वर्षांपूर्वी आपल्या आहारात पनीरचा समावेश फार मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता. परंतु आता मात्र पनीरचा समावेश वाढू लागलेला आहे. महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीमध्येही पनीरचा समावेश होऊ लागला आहे. आहारात पनीरचा समाविष्ट केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे.
पनीर का खायला हवे?
पनीरमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन डी मुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्राॅल आणि उच्च रक्तदाब सामान्य राहतो. म्हणूनच मधुमेही रुग्णांसाठी हा पनीर हा सर्वोत्तम आहार आहे.
पनीरमध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, फोलेट सारखे पोषक घटक गर्भवती महिला आणि जन्माला येणारे बाळ निरोगी राहते.
पनीरमध्ये प्रथिनांचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे स्नायूंची वाढीसाठी पनीर हे खूप गरजेचे आहे.
रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पनीर हे खूप गरजेचे आहे.
पनीरमध्ये असलेल्या घटकांमुळे हृद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पनीरमध्ये आढळणारे लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांमुळे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
निरोगी राहण्यासाठी, आपल्याला निरोगी नाश्ता करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला नाश्त्यामध्ये तळलेले पदार्थ टाळायचे असतील तर, तुमच्यासाठी पनीर हा एक चांगला पर्याय आहे. पनीर हा उच्च प्रथिनयुक्त आहार आहे. म्हणून, नाश्त्यामध्ये कॉटेज चीज खाल्ल्याने, म्हणजेच पनीर खाल्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा जाणवेल. पनीर खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही, कारण ते पचायला बराच वेळ लागतो.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)