
दिवसाला आपले केस ठराविक मर्यादेपर्यंत गळतात. पण त्याउपर जर जास्त केस जात असतील तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तर केसांचे आरोग्य नक्कीच सुधारते.
१) केस वेळच्यावेळी धुणे – साधारणत: आठवड्यातून किमान 2 वेळेला तरी केस धुतले गेले पाहिजेत. केसांवर जी धूळ बसते ती केसांना चिकटून बसते. त्यामुळे केसात कोंडा होतो, खाज येते. केस गळतीस सुरुवात होते. केस धुण्यासाठी शाम्पू आणि कंडिशनरचा वापर केला पाहिजे. तसेच केस कोमट किंवा थंड पाण्याने धुवावे. यामुळे केसांची चमक कायम राहील.
2) केस हळुवार हाताळा – बऱ्याचजणांना केस धुतल्यानंतर जोरजोरात पुसायची सवय असते. त्यामुळे केस तुटतात. केस धुताना केसात गुंता होतो. तो काढण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. केस अलगदपणे मोकळे करावेत.
३) योग्य आहार घ्यावा – कोणतेही सौंदर्य हे आतून येते. केसांसाठीही आरोग्यदायी आहार आवश्यक असतो. प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करा. शेंगदाणे, अंडे, बदाम, फळे, कडधान्ये, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.
४) केसांना कृत्रिम रंग लावणे टाळावे – हल्ली खूप तरुण वयातच केस पांढरे होतात. ते काळे करण्यासाठी डाय वापरतात. बरीचजण विविध रंगांचे प्रयोग केसांवर करतात. शक्यतो हे करू नये. केस काळे करण्यासाठी मेंदीचा वापर करावा. तसेच केस सरळ किंवा कुरळे करण्यासाठी स्ट्रेटनिंग मशीन वापरले जाते. हे तर केसांसाठी फारच हानिकारक असते. यामुळे सर्वाधिक केस गळतात व तुटतात.
५) केस वेळच्यावेळी कापणे – केस जरी लांबसडक ठेवायचे असतील तरी ते खालून नियमित कापणे गरजेचे आहे. तरच ते आकारात वाढतील.
६) केस घट्ट बांधणे – खु जणींना घट्ट अंबाडा किंवा पोनीटेल बांधण्याची सवय असते. यामुळे कपाळाजवळची मुळे दुखावली जातात. आणि समोरचे केस जायला सुरुवात होते. उन्हात किंवा पावसात केस मोकळे ठेवू नये. उन्हामुळे केस लवकर पांढरे होतात. पावसामुळे चिकट होतात.
7)केस सतत हाताळू नका.- काहीजणांना सतत केसांतून हात फिरवण्याची सवय असते. यामुळे केसांची मुळे दुखावतात.



























































