
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाला मुंबईतील प्रसिद्ध वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी हरकत घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
मराठा समाजाला राज्य सरकारने शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱयांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्यासाठी नुकतेच आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारने हे पाऊल उचलले आहे. वास्तविक, आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला नसून राष्ट्रपतींना आहे. तसेच 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण असणे हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी ऍड. सदावर्ते यांची मागणी आहे.



























































