
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने 11 आणि 12 एप्रिलला सुनावणी निश्चित केली आहे. याआधी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सुनावणी घेतली होती. सुनावणी अंतिम टप्प्यात आली असतानाच न्यायमूर्ती कर्णिक यांची गोव्यात बदली झाली. त्यामुळे मलिक यांना न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे नव्याने दाद मागावी लागली. मंगळवारी त्यांच्या अर्जाची दखल घेत न्यायमूर्तींनी 11 आणि 12 एप्रिल अशी दोन दिवस सलग सुनावणी घेणार असल्याचे निश्चित केले.


























































