
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने तुफान बॅटिंग केली होती. पण मुंबईला मात्र अक्षरश: झोडपून काढले होते.
मुंबईलगत असलेली वसई, नालासोपारा आणि विरार ही ठिकाणे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर दोन – तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पर्जन्यराजाने पुन्हा दमदार ऐन्ट्री केली असून शनिवारपासून मुंबई व उपनगरात संततधार सुरू आहे. दरम्यान, संततधार पावसामुळे राज्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढला आहे. यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.




























































