
संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. उद्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढणार आहे.
मुंबई ठाणे परीसर पालघरला देखील पुढील पाच दिवस यल्लो अलर्ट आहे. आज मुंबई ठाणे परिसरात सायंकाळी मुसळधार पाऊस पडला असून अनेक सखल भागात पाणी साचले होते. ठाण्यातील कळवा मुंब्रा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून त्यामुळे रस्त्यांवर पाण्य़ाचे लोट वाहत होते. रेल्वे स्थानकात देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.































































