
सामना प्रतिनिधी। आष्टी
आष्टी शहरात पावसाने दिवसभर थैमान घातल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. यामुळे परिसरात चिखल व दलदल निर्माण झाले आहे. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास रिमझीम पावसास सुरूवात झाली होती. मात्र सायंकाळी चार नंतर वातावरण अचानक बदलले. आकाशात काळेकुट्ट ढग आल्याने सर्वत्र अंधारले आणि धो-धो पावसाला सुरूवात झाली. यामुळे नागरिकांची धावपळ झाली.
दिवसभराच्या पावसामुळे आष्टी शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले असून रस्ते पण्याखाली गेले आहेत. तर नाले व तलावही तु़डुंब भरल्याने परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर जागोजागी डबके साचल्याने वाहनधारकांना वाहने चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे.



























































