बीडमधील वडवणी तालुक्यात मुसळधार पाउस, खरीपाचे प्रचंड नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील वड़वणी तालुक्यातल्या देवड़ी परिसरात सायंकाळी पावसाने दमदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने देवड़ी गावालगत असलेल्या दोन्ही नद्यांना पुर आला असून बंधारे ओसंडून वाहु लागले आहेत. एकीकड़े आजच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी दुसरीकडे मुसळधार पावसाने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके वाहुन गेली आहेत.

वडवणी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे.  वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. तालुक्यातील खळवट लिंबगाव, देवडी, चिंचवडगाव आणि काडीवडगाव या गावात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं. तर दुसरीकडे मुसळधार पावसाने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहुन गेल्याचा प्रकार घड़ला. नद्यांना पूर आल्यानं काही काळ खळवट लिंबगाव – देवड़ी – वडवणीचा संपर्क तुटला होता.