भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर नगर जिह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात गत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत घाटघरला 157 मि.मी. पावसाची नोंद झाली. रतनवाडीतही जोरदार पाऊस कोसळत आहे.

भंडारदरा, घाटघर आणि रतनवाडीत गत पाच दिवसांपासून मान्सून सक्रिय आहे. कमी-अधिक प्रमाणात सरी कोसळत होत्या. पण, काल कोकणकडा, कळसूबाई शिखर, घाटघर, रतनवाडी आणि पांजरेत जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धबधबे आता अक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. घाटघर आणि रतनवाडीत अधूनमधून धो-धो पाऊस कोसळत असल्याने या भागातील ओढे-नाले भरून वाहत आहेत. पाणलोट क्षेत्र धुक्याने लपेटून गेले असून, भात खाचरांमध्ये आता पाणी साचू लागले आहे. संततधार सुरू असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

11039 द़ ल.घ.फू. क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 5290 द़ ल.घ.फू. होता. निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत आहे. वाकी तलावातील पाणीसाठा वाढू लागला असून, हा तलावातील पाणीसाठा निम्मा होणार आहे. 112 द़ ल.घ.फू. क्षमतेच्या या तलावात काल सायंकाळी 50 द़ ल.घ. फू. पाणीसाठा होता. पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे पाणलोटात शेतकामांनी वेग घेतला आहे. 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा- (मि.मी.) भंडारदरा 79, घाटघर 157, रतनवाडी 135, वाकी 57.

पिंपळगाव खांड पन्नास टक्के भरले

मुळा धरणाच्या आंबित, पाचनई व अन्य भागात पावसाचा जोर टिकून असल्याने 600 द़ ल.घ.फू. क्षमतेच्या पिंपळगाव धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पिंपळगाव खांड पन्नास टक्के भरले आहे. मुळा नदी वाहती झाल्याने हे पाणी पिंपळगाव खांड धरणात जमा होऊ लागले आहे. त्यामुळे या नदीवरील कोतूळ-अकोले रस्ता बंद होणार आहे. परिणामी पर्यायी मार्ग सुरू करावा लागणार आहे.