
मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 13 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या नपकसानीची माहिती मिळाली आहे.
मंडणगड तालुक्यात मौजे अडखळ येथील बंडू यशवंत हिलम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 47 हजार 900 रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीतहानी नाही. दापोली तालुक्यात मौजे भडवळे येथील ओंकार रामचंद्र खरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे..तर जिवीतहानी झालेली नाही. चिपळूण तालुक्यात मौजे कापसाळ येथील सुरेखा सुरेश साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 6 हजार रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही.
गुहागर तालुक्यात मौजे आरे येथील केतन नवनाथ भोसले रविवारी कातलवाडी नदीवर पोहण्यासाठी गेले असता बुडून मृत्यू झाला. मौजे पडवे येथील वसंत गणपत राऊत यांच्या 3 म्हैशी पऱ्यात पडून त्यातील एकीचा मृत्यू झाला तर 2 जखमी झाल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यात मौजे कोळंबे येथील बंडू लिगांयत यांच्या पडवीचे पावसामुळे अशंत: 30 हजार रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मौजे पाटगाव येथील रामचंद्र सोनू पागार यांच्या विहिरीचे पावसामुळे अंशत: 40 हजार रुपयांचे नुकसानझाले असून कोणतीही कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. राजापूर तालुक्यात मौजे तळवडे येथील बाबाजी गोरे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले आहे.



























































